च वं निखील साहेब वागळे साहेब….

या क्षणी मला भरून आलंय. भरून म्हणजे काय, अगदी भरभरून आलंय…

उद्या तिथीनुसार शिवबांची, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. म्हणून मी मिडिया मध्ये त्याविषयी काही माहिती दिसते का, ती शोधत होतो… पण कुठे फारसं काहीच दिसत नव्हतं…

मग एकदम दिसलं… अन एकदम जाणवलं…

Nikhil Wagale

आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख शिलेदार, महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे भविष्यकार, चरण वंदनीय, मर्द ‘मराठा’ निखील साहेब वागळे साहेबांनी नवीन शिवाजी महाराज शोधले आहेत. ‘कन्हैय्या’ नावाच्या या परमपवित्र (नवीन) शिवाजी महाराजांना आपल्या परमपवित्र महाराष्ट्रात (म्हणजे त्यांच्या च्यानेल वर नाही…. खऱ्याखुऱ्या महाराष्ट्रात !) आणण्यासाठी निखील साहेब वागळे साहेब (हो.. आणखी एक ‘साहेब’ नावापुढे लागला तरी चालेल, पण ‘साहेब’ शिवाय निखील साहेब वागळे साहेबांचं नाव घ्यायचं नाही, अशी सक्त ताकीद आहे च्यानेल मधे..!) जंग छंग पछाडत आहेत. निसावासा (निखील साहेब वागळे साहेब) यांच्या फेसबुक भिंती वर तर श्रीमान कन्हैय्याजींच्या शिवाय दुसरी कुठली पोस्टचं दिसत नाहीये..!

गेली काही दिवस महाराष्ट्र उदासवाणा वाटत होता… म्हणजे निसावासा यांचा आवाजच लागत नव्हता. कुठलं नेतृत्वच समोर दिसत नव्हतं. श्रीमंत अजितदादा सरकारांच्या मनोरंजक आणि मनोवेधक वक्तव्याला ही ओहोटी लागली होती. त्यातंच नवीन च्यानेल सुरु केलेलं…

Exchange4media National Broadcasting Awards 2011आता नेतृत्व नाही, मसाला नाही, भांडणं नाही म्हणजे चरण वंदनीय निखील साहेब वागळे साहेबांचं (निसावासा) ओरडणं ही नाही. ते ओरडणं नाही म्हणजे टी आर पी नाही. आणि टी आर पी नाही तर नवीन च्यानेल चालवायचं कसं..? आपल्या चरण वंदनीय (च वं) निसावासा समोर हा मोठा गंभीर प्रश्न होता…

टी आर पी वाढविण्यासाठी च वं निखील साहेब वागळे साहेब रोज (म्हणजे अगदी रोज..) ओरडण्याची प्रेक्टिस करतात म्हणे ! त्यांची काही माणसं त्यांनी शिताफीने ‘टाईम्स नाऊ’ मधे घुसवली आहेत. ती रोज निसावासा यांना अर्णब गोस्वामीं च्या ओरडण्या ची डेसिबल रेटिंग कळवत असतात. त्या रेटिंग पेक्षा किमान २ डेसिबल तरी जास्त जोरात ओरडायचं असं निखील साहेब वागळे साहेबांचं ध्येय आहे असं जाणकार सांगतात. पूर्वी, ते घरी ही ओरडण्याची प्रेक्टिस करायचे. पण सोसायटीच्या तक्रारी वाढल्या, कारण निसावा साहेबांचं ओरडणं ऐकून सोसायटीतली कुत्री जोरजोराने भुंकू लागत असं सांगितलं जातं. तितक्यात निसावा साहेबांचं च्यानेल तयार झालं. आता च्यानेल च्या साऊंड प्रूफ खोलीत निसावासा ही प्रेक्टिस करतात म्हणे..! असो.

पण प्रेक्टिस करून ती वापरायची कुणावर ? आणि म्हणून रोज त्यांच्या ओरडण्याचे डेसिबल रेटिंग अर्णब काकांच्या रेटिंग पेक्षा दोन – चार ने तरी कमीच असायचे. म्हणजे झाले ना झोपेचे खोबरे..!

पण निसावासा जरी देव मानत नसले तरी ‘देवाच्या घरी उशीर आहे, पण अंधार नाही’ ही म्हण त्यांना पूर्णपणे पटली आहे…

कारण तसं नसतं तर हे आधुनिक (नवीन) शिवाजी, कन्हैय्याजी, कुठून अवतरीत झाले असते? आणि कन्हैय्याजी नसते तर श्रीमंत हाडहाड सरकारांना कुठून कंठ फुटला असता..? आणि तसं जर नसतं झालं तर च वं निसावासा यांच्या आवाजाचे डेसिबल कसे वाढले असते..?

kanhaiya kumar

एकूणात काय, तर हे सर्व झालं ते आपल्या कन्हैय्या जीं मुळे..! म्हणूनच देशातील एकमात्र आशास्थान, श्रीमान कन्हैय्याजी महाराष्ट्रात आले की सर्व समाजवाद्यांना, साम्यवाद्यांना, राष्ट्रवाद्यांना म्हणजेच हाडहाड सरकारांना आणि राहुल स्वामींच्या अनुयायांना सुध्दा कंठ फुटणार…

म्हणजे विरोधकांवर च वं निसावा साहेबांचा आवाज चढणार. म्हणजेच अर्णब काकांपेक्षा निसावा साहेबांचा आवाज २ डेसिबल चढणार…

म्हणजेच निखील साहेब वागळे साहेबांचं च्यानेल धो.. धो.. चालणार…

आता आले का लक्षात..?
– प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s