युरोप मधला मुस्लीम ‘प्रश्न’

प्रशांत पोळ

मार्सेलिस (फ्रेंच भाषेत ‘मार्सिये’). मार्सेलिस म्हटलं की आपल्याला वीर सावरकर आठवतात. त्यांची ती जगप्रसिद्ध उडी आठवते. त्यांच्या त्या काटक देहात असलेल्या विजिगिषु वृत्तीने आपण भारून जातो. ती फ्रेंच पोलिसांची अरेरावी पण आपल्याला आठवत राहते.

मार्सेलिस हे फ्रांस चे दुसऱ्या क्रमांकाचे शहर. मोठे बंदर. आफ्रिकेचा दरवाजा. उपनगरं मिळुन १६ लाख लोकसंख्या असलेले हे शहर सध्या वेगळ्याच कारणासाठी गाजतेय. ते पश्चिम युरोपातले पहिले मुस्लीम बहुल शहर बनण्याच्या मार्गावर आहे. विकिपीडिया च्या आकड्यांनुसार या शहरात २५% मुसलमान राहतात. मात्र इतर सर्वत्र हाच आकडा ३५% ते ४०% दाखवला जातो. अर्थात या मार्सेलिस शहराची किमान एक तृतियांश लोकसंख्या ही मुसलमान आहे हे निश्चित! थोडक्यात मार्सेलिस हे ‘मोस्ट इस्लामीफाईड सिटी इन वेस्टर्न युरोप’ असे ओळखल्या जातेय.

मार्सेलिस मधे सुमारे १ लाख ज्यू राहतात. या ज्यूं ना त्रास देणाऱ्या घटना सध्या वाढताहेत असं युरोपातील प्रसार माध्यमांचं मत आहे. मार्सेलिस पासून मोरक्को, अल्जीरिया, ट्युनेशिया हे देश जवळ आहेत. हे सर्व देश इस्लाम ला मानणारे आहेत. त्यातून आफ्रिकन मुसलमान हे जरा जास्तच आक्रामक असतात असं युरोप मधे मानलं जातं. सध्या मार्सेलिस च्या अनेक भागात या आफ्रिकन मुसलमानांच्या अश्या वसाहती तयार झाल्या आहेत की तिथे इतर फ्रेंच मंडळी राहत तर नाहीच, पण काही कामाकरता जाण्याचं सुद्धा टाळतात. फ्रेंच पोलीस सुद्धा अश्या काही वस्त्यांमध्ये जायला घाबरतात!

After Paris Attack

साठ लाख मुसलमान राहत असलेल्या फ्रांस मधे स्त्रियांनी बुरखा घालायला बंदी आहे. यावरूनच गेल्या महिन्यात मार्सेलिस मधे एक प्रसंग उद्भवला. मार्सेलिस च्या बस स्थानकावर एका जवळच्या गावाला जाणाऱ्या बस मधे एक तरुणी चढू लागली. तिने बुरखा घातला होता. सहाजिकच बस ड्रायव्हर ने आक्षेप घेतला आणि तिला बस मधे चढायला मनाई केली. मात्र बस मधे चढलेल्या काही मुस्लिम तरुणांना हे आवडलं नाही. त्यांनी ड्रायव्हर ला चक्क मारहाण केली अन् त्या मुस्लिम तरुणीला बस मधे चढण्यास सांगितले. तितक्यात पोलीस आले आणि त्यांनी त्या मुसलमान तरुणांना ताब्यात घेतलं. मात्र खरी गंमत पुढेच आहे. हे प्रकरण प्रसार माध्यमात गाजलं. शेवटी ‘मार्सेलिस ट्रान्सपोर्ट एथोरिटी’ च्या अध्यक्षाने हस्तक्षेप केला. पण त्याने बाजू घेतली ती त्या बुरखा घेतलेल्या मुस्लिम तरुणीची. अन् ह्या अध्यक्षांचं नाव होतं – करीम झेरीबी..! यावरून फ्रेंच प्रसार माध्यमात बरीच चर्चा घडतेय. वरिष्ठ किंवा महत्वाच्या पदावर मुस्लिम माणुस बसला तर तो कायद्यापेक्षा त्याच्या धर्माचा पक्ष घेईल अन् मग साऱ्या व्यवस्थेचं काय होईल.?

एक अजून महत्वाचा प्रश्न फ्रेंचांना सतावतोय. मुस्लिम नागरिकांचं सरासरी वय आहे – ३५.७ वर्ष. तर इतर, मुस्लिमेतर फ्रेंच नागरिकांचं सरासरी वय आहे – ४३.५ वर्ष. कारण लोकसंख्या वाढीचा वेग हा आफ्रिकन मुसलमानांमध्ये फ्रेंचांच्या तुलनेनं खुपच जास्त आहे! अर्थात पुढच्या दहा / पंधरा वर्षात जनसंख्येचं संतुलन कसं राहील याची त्यांना चिंता वाटतेय..!

मार्सेलिस चं इस्लामीकरण झपाट्याने होत असलं तरी मार्सेलिस हे अपवाद नाही. ब्रुसेल्स, स्विडन चं मॉल्मो, आणि नॉर्वे चं ऑस्लो ही शहरं सुद्धा वाढत्या इस्लामिकरणामुळे हादरली आहेत. तीन लाख लोकवस्तीच्या मॉल्मो शहरात ४५,००० पेक्षा जास्त मुसलमान राहतात. ब्रुसेल्स मधेही १०% ते १४% मुसलमानांची वस्ती आहे. हे प्रमाण जरी लहान वाटत असलं तरी त्यांचं उपद्रवमुल्य जबरदस्त आहे. नाझींच्या छळ-छावण्यांतून सुखरूप मायदेशी परतल्यावर ज्युडीथ पोपिंस्की या ज्यू महिलेचं मॉल्मो मधे चांगलं स्वागत झालं होतं. गेली साठ वर्ष आपल्या मुला-नातवंडांसह ती येथे गुण्यागोविंदाने नांदली. मात्र गेल्या वर्षी मॉल्मो शहरातलं, एक हजार ज्यू नागरिकांचं आश्रयस्थान जेंव्हा मुस्लिम गुंडांनी जाळून टाकलं, तेंव्हा मात्र ज्युडीथ आजी हादरल्या. आणि त्याचबरोबर हादरलं मॉल्मो शहरंही. इस्लामी प्रभावाचे चटके त्यांना जाणवायला लागले.

Islam in Europe

नॉर्वे ची कथाही काही वेगळी नाही. सुमारे दहा वर्षांपूर्वी मी जेंव्हा ऑस्लो मधे रेल्वे ने प्रवेश केला होता तेंव्हा रेल्वे स्थानकाबाहेर अनेक भारतीय चेहरे दिसत होते. मात्र नंतर कळलं की ही सारी मंडळी पाकिस्तानातुन आश्रयाला आलेली आहेत. नॉर्वे सरकारनं नव्वद च्या दशकात पाकिस्तानातुन विस्थापित होणाऱ्या अनेकांना आपल्या देशात राजकीय आश्रय दिला. भूतदयेनं केलेली ही मदत नॉर्वे ला आता महागात पडतेय.

ऑस्लो च्या पूर्वेला अनेक शतकांपासून डेनिश लोकांची वस्ती आहे. या ‘डेनिश घेट्टो’ मधून ज्यू आणि ख्रिश्चन आता स्थलांतर करताहेत, कारण त्या भागात मुसलमान निर्वासितांची संख्या वाढत चालली आहे.

नॉर्वे च्याच ओडेंस शहराच्या वोल्समोस या उपनगरातुन ख्रिश्चन आणि ज्यू जवळपास पूर्णपणे स्थलांतरित झाले आहेत कारण त्यांना मुस्लिम शेजाऱ्यांकडून धमक्या मिळत होत्या. कोपेनहेगन मधे ज्युईश मुलांच्या पालकांना असा सल्ला देण्यात येतोय की त्यांनी आपल्या मुलांना शहरातल्या ख्रिश्चन बहुल भागातच शिकायला पाठवावं.

ऑथर ब्रुस बॉवर नावाच्या वरिष्ठ युरोपियन पत्रकाराने या सर्व प्रकारांबाबत फारच विषादाने लिहिलंय. तो म्हणतो, पेरिस असेल, कोपेनहेगन असेल नाहीतर मॉल्मो. ख्रिश्चन आणि ज्यू मार खात सुरक्षित ठिकाणी पळताहेत. आम्ही आमच्याच घरी चोरासारखं राहतोय. लंडन मध्ये राहणारे ज्यू सुद्धा शहरापासून दूर, इंग्लंड च्या पर्वतीय भागात स्थलांतरित होताहेत. बॉवर पुढे म्हणतो, वर्षानुवर्ष युरोप च्या भोळसट, विवेकशून्य आणि दुर्बळ राजकीय नेतृत्वानं ह्या मुस्लिम आक्रामकांना आश्रय दिला आणि त्याची विषारी फळे आम्ही भोगतोय..!

बॉवर च्या लिखाणात तथ्य आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या फ्रेंच निवडणुकीत जे काय घडलं, ते बघून आपल्या भारतीय राजकारण्यांची हमखास आठवण होते. फ्रांस चे पूर्वीचे राष्ट्रपती निकोलस सार्कोझी हे रंगबाज असले तरी कडक आणि राष्ट्रवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कारकीर्दीतच फ्रांस मधे बुरखा घालण्यावर बंदी आली. सहाजिकच फ्रांस मधले मुसलमान मतदार त्यांच्या विरोधात गेले. गेल्या वर्षी एप्रिल मधे झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हे सार्कोझी परत निवडून येऊ शकले नाहीत. त्यांचा फ्रान्कोईस हॉलंड यांनी सुमारे सोळा लाख मतांनी पराभव केला. हे असं कां झालं? तर फ्रान्कोईस हॉलंड यांनी ४ लाख अवैध मार्गांनी राहणाऱ्या मुसलमान स्थलांतरितांना फ्रांस चे नियमित नागरिक करण्याची घोषणा केली होती.

फ्रांस मधे साधारणतः वैध / अवैध मार्गाने साठ लाख मुसलमान राहतात. त्यातील सुमारे २२ लाख मुसलमान मतदार आहेत. प्रसार माध्यमांनी (ली-फार्गो सारखं वर्तमानपत्र आणि इतर वृत्त-संस्था) घेतलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की ९३% मुस्लिम मतदारांनी फ्रान्कोईस हॉलंड यांना मतदान केलं. अर्थात फ्रांस च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुसलमानांची निर्णायक भूमिका होती आणि त्यांच्या पाठिंब्यानेच फ्रान्कोईस हॉलंड निवडून आले. आणि म्हणुनच फ्रांस मधील विचारवंत सध्या काळजीत आहेत. मुसलमानांचं लांगूलचालन करून निवडणूक जिंकण्याची ही परंपरा फ्रांस ला कोठे घेऊन जाईल याची त्यांना चिंता वाटतेय.

मात्र या विषयावर इतर देशांमध्ये जागृती होऊ घातली आहे. स्वित्झर्लंड चं उदाहरण समोर आहे. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी तेथे मशिदी बांधण्याचं प्रमाण अचानक वाढलं. स्वित्झर्लंड च्या घटनेत लिहिलंय की जर एखाद्या विषयावर एक लाखांपेक्षा जास्त स्वाक्षऱ्या गोळा करून त्या शासनाजवळ जमा केल्या तर त्या विषयावर जनमत-संग्रह (referendum – सार्वमत) घेता येतो. तेथील काही विचारवंतांनी ‘मिनारेटस्’ (मशि‍दींना तेथे मिनारेटस् म्हणतात) च्या विरोधात चळवळ उभी केली. एक लाखांपेक्षा जास्त सह्यांचं निवेदन दिलं. मग त्यावर सार्वमत घेतलं गेलं. अन् जवळ-जवळ एकमतानं तिथल्या पार्लीयामेंट नं कायदा बनवला की स्वित्झर्लंड मधे नवीन मशीद बांधता येणार नाही. गेल्या तीन वर्षांपासुन स्वित्झरलंड मधे एकही नवीन मशीद बांधल्या गेलेली नाही.

मात्र याची प्रतिक्रिया मुसलमानांमध्ये ही होतेय. बुरख्यावर बंदी, मशि‍दींवर बंदी अश्यासारख्या गोष्टी म्हणजे आपल्या धर्मावर आघात आहेत असं त्यांचं मत बनत चाललं आहे. मुस्लिम आणि युरोपियन राज्यकर्ते यांच्यातील तेढ वाढतंच चालली आहे. मुळात हे सह-अस्तित्वाचंच संकट आहे. पुढील काही वर्ष ही महत्वाची ठरणार आहेत. स्विडन, नॉर्वे, डेन्मार्क अश्या नॉर्डिक देशांमध्ये आणि फ्रांस, ब्रुसेल्स सारख्या देशांमध्ये मुसलमानांची संख्या वाढतंच जाणार आहे. त्याच बरोबर ‘आपल्याच देशात आपण परके’ ही भावना युरोप च्या ख्रिश्चन आणि ज्यू नागरिकांमध्ये घर करतेय. या सर्वांचा परिणाम संघर्षात होईल असे संकेत आज तरी मिळताहेत..!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s